पननी या मादक वस्तू विक्री करणाऱ्या युवकास अटक करून त्याच्या जवळील 58 हजारांचा मुद्देमाल जप्त जप्त करण्यात आला आहे. मोहम्मद तौसिफ बशीर अहमद काजी वय 37 रा. वीरभद्र नगर बेळगाव असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहिती वरून शिवाजी नगर जेल कॉलनी नजीकच्या मराठी शाळे जवळील खुल्या जागेत बेकायदेशीर रित्या पननी विक्री चालू होती त्यावेळी पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा छापा घालून कारवाई केली. तौसिफ जवळील 31 हजार रुपयांची पण्णी,27600 रुपये रोख,25 लायटर आणि 7 रेल्वे तिकिटे मिळून एकूण 58 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त डी सी राजप्पा उपायुक्त सीमा लाटकर आणि अपराध विभागाचे डी सी पी महानिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर सहकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली सदर छाप्याने पननी विक्री आणि सेवन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.