जारकीहोळी आणि हेब्बाळकर यांच्यातील द्वंद्व मिटवण्यासाठी काँग्रेस प्रभारी वेणूगोपाल यांनी आज शनिवारी बोलावलेल्या सभेस मी जाणार नाहीमात्र पालकमंत्री रमेश जारकीहोळी या बैठकीत सहभागी होतील अशी माहीती सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांना दिली आहे.
चिकोडी आणि बेळगाव लोकसभे निवडणुकी बद्दल आजच्या सभेत चर्चा होणार आहे माझे पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने मी त्या बैठकीला हजर राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केलं.समन्वय समितीच्या बैठकीत मंत्री मंडळ विस्तारा बद्दल चर्चा होणार आहे संमिश्र सरकार कोसळणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राजकारणात चांगलं सांगितलं तरी विरोधच करतात वाईट सांगितलं तरी विरोधच करतात शेवटी राजकारणात नेतृत्व वर यायचं म्हणजे जिंदाबाद पण पाहिजेच मुर्दाबाद पण पाहिजेच म्हणजेच नेतृत्व तयार होतंय असे देखील त्यानी नमूद केले.
पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी माझ्यावर पण बऱ्याचदा टीका केली आहे त्य टीका करण्यात कुणालाही सोडलं नाही आता हेब्बाळकराना त्यांनी टार्गेट केलंय. पालक मंत्र्यांनी आपली भाषा बदलावी असा सल्ला देखील त्यांनी आपल्या बंधूंना दिलाय.गेल्या 30 वर्षाच्या राजकारणात मी कुणालाही पर्सनल घेत नाही असेही त्यांनी नमूद केलं.