जारकीहोळी ब्रदर्स विरुद्ध तक्रार द्यायला गेलेल्या ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना पक्ष श्रेष्ठीकडून कान पिचक्या मिळाल्या आहेत.जारकीहोळी बंधु मुळे आपणाला त्रास होत आहे अशी तक्रार त्यांनी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांच्या कडे तक्रार द्यायला गेले असता वेगळंच घडलं आहे.
आपण ग्रामीण मतदार संघात पन्नास हजारहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला आहे मात्र जारकीहोळी ब्रदर्स विनाकारण त्रास करताहेत मी एक महिला लोक प्रतिनिधी आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी लिंगायत समाजातून असताना मला त्रास करत असल्याची तक्रार त्यांनी मांडली.त्यावर राज्य प्रदेश अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी लक्ष्मी यांच्या कानपिचक्या केल्या आहेत.
राजकारणात या सगळ्या गोष्टी सामान्य आहेत पहिल्यांदा आमदार झालाय म्हणजे जिल्ह्यातील वरिष्ठ आमदारांसोबत समनव्य साधून वागा अन्यथा तुम्हालाच त्रास होईल त्यामुळं समनव्य खूप महत्त्वाचा आहे असे सुनावले आणि याबाबत जारकीहोळी ब्रदर्स सोबत मी चर्चा करतो असे सांगून त्यांचे समाधान केले आहे.
जारकीहोळी विरुद्ध हेब्बाळकर हा संघर्ष हाय कमांड कडे पोचला आहे.
बातमी सौजन्य:उदयनाडू