गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणत्या मंडळाचा गणपती शेवटी विसर्जित केला जातो याची स्पर्धा लागलेली असते त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला विलंब होत असतो यासाठी महा पालिकेचा गणपती सर्वात शेवटी विसर्जित करा अश्या सूचना जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी दिल्या.
पोलीस खात्याच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी आर टी ओ सर्कल जवळील पोलीस कार्यालयात आयोजित केलेल्या महामंडळ आणि गणेश मंडळांच्या बैठकीत बोलत होते.यावेळी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा,पोलीस उपायुक्त सीमा लाटकर,महा पालिका आयुक्त शशीधर कुरेर,डी सी पी महानिंग नंदगावी, महा मंडळ पी आर ओ विकास कलघटगी आदी उपस्थित होते.
माजी नगरसेविका नेताजी जाधव यांनी विसर्जन मिरवणुकीत शेवटी गणेश विसर्जन करण्या वरून विलंब होत असून प्रशासनाने हा वाद मिटवावा अशी मागणी केल्यावर जिल्हाधिकारी यांनी वरील सूचना दिल्या आहेत. शहरातील गणेश मंडळांना सुविधा म्हणून परवानगीसाठी शहरात चार सिंगल विंडो सिस्टम सुरू होणार आहेत. गणेश मंडळांना सर्व शासकीय परवानग्या एकाच कार्यालयात देण्याची सुविधा देण्यात येतील अशी माहिती पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी दिली.
बेळगाव शहरातील गणेश उत्सव राज्यात मोठा आहे यंदाची मिरवणूकित 300 कॅमेऱ्याचा बंदोबस्त असणार आहे उत्सव काळात कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी दिला.शहरात 357 गणेश मंडळ आहेत डॉल्बी ला खर्च करणारे पैसे केरळ कोडगू ला मदत करा असे आवाहन देखील डी सी राजप्पा यांनी केलं .यावेळी गणेश महामंडळ आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनेक सूचना मांडल्या.