गणेश उत्सवाच्या सुरुवाती अगोदर पाऊस कमी होताच शहरातील रस्त्यांचे खड्डे बुझवले जातील दरवर्षी प्रमाणे गणेश विसर्जनासाठी महा पालिकेच्या वतीनं सर्व सुविधा दिल्या जातील असे आश्वासन महा पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनी दिले आहे.
पालिकेच्या वतीनं गणेश महामंडळ,गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह प्रशासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती.डी सी पी सीमा लाटकर,महापौर बसप्पा चिखलदिनी, उपमहापौर मधूश्री पुजारी,स्थायी समिती अध्यक्ष सत्ताधारी आणि विरोधी गटनेते उपस्थित होते.
विसर्जन मिरवणूक मार्गातील वाढलेली झाड आणि खाली आलेल्या विद्युत तारा दूर करून अडथळे दूर करा अश्या सूचना हेस्कॉम आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. गणेश विसर्जन होई पर्यंत शहरातील खड्डे आणि वायर बाजूला काढा अश्या सूचना हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पी ओ पी मूर्तींवर बंदी घालू नये कारण बेळगाव शहर परिसरात कोणतीही नदी नसल्याने प्रदूषण होत नाही अशी मागणी महा मंडळ आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर पालिका आयुक्तांनी केवळ महानगर पालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या कामा बद्दल आणि सुविधेसाठी बैठक बोलावली आहे डॉल्बी आणि पी ओ पी हा जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीतील विषय आहे असे स्पष्ट केलं.
गणेश उत्सवात कायदा आणि सुव्यवस्थे बद्दल उद्या शुक्रवारी सायंकाळी बैठक आहे तिथेच सगळी चर्चा करू अशी माहिती देत विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहन केलं.यावेळी नगरसेवक पंढरी परब यांनी कुद्रेमानी येथील जुगार अड्डयांवर घातलेल्या धाडीमुळे सामान्य जनतेच्या फायदा झाला असल्याचे सांगत सीमा लाटकर यांच्या कारवाईच अभिनंदन केले.शहापूर भागात हिंदवाडी आणि नवीन विसर्जन तलाव बांधा अशी मागणी शहापूर महा मंडळाच्या वतीने करण्यात आली.