त्यांच्या रोजीरोटीसाठी त्यांना आता कसरत करावी लागत आहे. असलेले छत्र हरवले असून त्यांना स्वतःच आता जीवनाचा प्रवास करावा लागणार आहे. त्यांच्या पंखांना बाळ देणारा कर्त्या मुलाने 27 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आता त्यांना देण्यातसाठी समाजातुन आर्थिक पाठबळाची गरज आहे. असे सांगत असताना मुलाच्या जाण्याचे दुःख तानाजी तिबले यांच्या पाणावलेल्या डोळ्यातून न कळत पाणी यात होते. अशीच व्यथा आहे चार दिवसा पूर्वी ईदलहोंड जवळ बस कारच्या अपघातात ठार झालेल्या ओल्ड गांधी नगर येथील दामोदर तिबले यांच्या आई वडिलांची…
संसाराचा गाढा सुरळीत सुरू असताना गोव्याहून परतताना गणेबैल येथे दामोदर तिंबळे आणि त्याचा मित्र रमेश तहसीलदार यांचा मृत्यू झाला होता. तानाजी तिबले हे दिवसभर उद्यमबाग येथे कामाला जाऊन सायंकाळी रिक्षा चालून आपल्या कुटुंबहाचा उदरनिर्वाह करीत होते. अचानक काळाने घातलेल्या झडपात त्यांच्यावर आता दुःखाचा डोंगर पडला आहे
दामोदर याने आपल्या बहिणीकडे राहून हॉटेल मॅनेजमेंट कोर्स पूर्ण केला होता.तो एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. दोन महिन्यांच्या सुट्टीवर आला असता रक्षाबंधन साठी आपल्या बहिणीकडे गोव्याला गेला होता. त्याच्यावर काळाने झडप घातली आणि संसाराचे सारे गणितच चुकले .
मुलगा नोकरीला लागल्यामुळे घरची गरिबी दूर सारत होती अश्यात ही घटना घडली आणि साऱ्या कुटुंबियानाच धक्का बसला. आता या कुटुंबियांची परिस्थिती हालाख्याची बनली आहे. समाजातील दानशूर व्यक्तीनि या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.