जारकीहोळी बंधू आणि ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. लक्ष्मी हेब्बाळकर या सतीश जारकीहोळी यांचे पाय ओढु शकत नाहीत अश्या शब्दात नगर प्रशासन मंत्री रमेश जारकीहोळी यांनी हेब्बाळकरा वर टीका केली आहे.
पी एल डी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाबत सुरू असलेल्या गोंधळाच्या वातावरणात पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वर टीका केली आहे. पहिल्यांदा विधानसभा जिंकलोय म्हणून जास्त मिजासकी मारू नको अश्या शब्दात त्यांनी हेब्बाळकर यांचा समाचार घेतला आहे.
त्या नूतन आमदार आहेत म्हणून त्यांना विनंती करत आहोत यात राजकीय आणू नका त्यांना देवांनी सुबुद्धी देवो असे देखील पालक मंत्र्यांनी टोला लगावला आहे. पी एल डी प्रकरणी लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. एकूणच सतीश विरुद्ध लक्ष्मी यांच्यातला राजकीय कलगीतुरा वाढला असून यात पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपले बंधू सतीश यांच्याच बाजूने आपला कौल दिल्याचे बोलले जात आहे.