बेळगाव पी एल डी बँक निवडणूक पुढे का ढकलली यावर माजी मंत्री आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांचं वक्तव्य आलेलं आहे.
पी एल डी बँक अध्यक्ष पद निवडणूक आमच्या साठी प्रतिष्ठेची बनली आहे कारण या अगोदर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक बिन विरोध व्हायला हवी होती.या निवडणुकीत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उडी घेतली आहे संचालकांना पैश्याचे आमिष दाखवून आपल्या कडे 9 संचालक आहेत असे सांगत असल्याचा आरोप त्यांनी हेब्बाळकर जारकीहोळी यांनी केला आहे.
या निवडणुकीत सदस्यांचं अपहरण झालं आहे त्या केस ला अनुसरून निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.ही अध्यक्ष पदाच्या निवडणुक प्रक्रियेत मी सहभागी आहे गेल्या दहा वर्षा पासून जसं अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले जातात तसं परंपरे नुसार व्हायला हवी होती असे ते म्हणाले. माझ्या विरुद्ध राजकीय आरोप होताहेत मात्र निवडणूक पुढे ढकलण्या साठी कोणताही दबाव आणला नसल्याचं त्यानी स्पष्ट केलं.
आमचे विरोधक असले तरी आम्ही निवडणूक करतच असतो सध्या असलेल्या 14 सदस्यात निवडणूक व्हावी जो हस्तक्षेप ग्रामीण आमदार करत आहेत त्यांनी यातून पाय काढून घ्यावा अस जारकीहोळी म्हणाले.