सेंट झेवियर्स स्कुलचा खेळाडू अयान किल्लेदार यानें मारलेल्या हॅट्ट्रिक सह चार गोलांच्या जोरावर सेंट झेवियर्स ने सेंट मेरी स्कुलचा 5-1 गोल फरकाने पराभव करत आठव्या फिनिक्स इंटर स्कुल फुटबॉल कप वर कब्जा केला.
सोमवारी सायंकाळी झालेल्या अंतिम सामन्यात झेवियर्स च्या अयान किल्लेदार यानें 26,29,40,आणि 46 व्या मिनिटाला हॅट्ट्रिक सह चार गोल केले तर सेंट मेरी च्या वतीने एकमेव गोल 27 व्या मिनिटाला आर्यन बिरजे यानें केला.
साळगावकर क्लब चे मँचेस्टर कप मध्ये भारतीय टीम मधून खेळलेले आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू केलम फर्नांडिस यांच्या हस्ते विजेत्या सेंट झेवियर्स ला बक्षीस पुरस्कार वितरित केला.सेंट झेवियर्स च्या या विजयाने त्यांची चोकर्स ही इमेज कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. दैनिक तरुण भारतचे क्रीडा प्रतिनिधी बेळगावचे रमाकांत आचरेकर म्हणून ख्यात असलेले रवी मालशेट यांनी झेवियर्स टीमला प्रशिक्षित केले आहे या विजयात त्यांचं योगदान मोलाचं आहे
Best goal keeper – Rishikesh godhwani( St.Xavier
2) Best player of the finals- Ayan Killedar(St.Xavier)
3)Best goal scorer- Ayan Killedar (St.Xavier)
4)Best up coming team- Love Dale central School. अशी निवड करण्यात आली.