खानापूर कडून भरधाव वेगानेयेणाऱ्या स्विफ्ट कार बेळगाव कडून खानापूर कडे जाणाऱ्या बस मध्ये आमोरासमोर अपघात झाल्याने कार मधील दोघे जण ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर रोड वर इदिलहोंड जवळ दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली आहे.
रमेश अशोक ताशीलदार वय 28 रा.कसाई गल्ली बेळगाव आणि दामोदर तिबीले वय 24 रा. ओल्ड गांधीनगर बेळगाव अशी मयत युवकांची नावे आहेत.
रमेश ताशीलदार हा घटनास्थळी मयत झाला तर दामोदर तिबिले बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. अन्य तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहेत. मयत रमेश हा हॅथवे केबल मध्ये कामाला होता.
या बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार कोल्हापूर खानापूर बस ओव्हर टेक करत असतेवेळी समोरून येणाऱ्या स्विफ्ट कार मध्ये अश्या दोघात जोराची धडक झाली त्यात हा अपघात झाला आहे.कामत गल्ली भागातील हे युवक असून पाचही जण गोव्याला गेले होते यांच्यातील एक जण दुबईला नोकरीला होता तो सुट्टीवर आला होता त्या नंतर सगळे जण फिरायला गेले होते अशी माहिती मिळाली आहे.
बस आणि कार दोघेही वेगात होते आमोरासमोर झालेला हा अपघात इतका भीषण होता की कार बस मध्ये घुसली होती.घटनास्थळी खानापूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला.अपघात होताच खानापूर रोड वर ट्रॅफिक जाम झाली होती.खानापूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.