जनावरांना चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्याला विद्युत भारित तारेचा स्पर्श होऊन शेतकरी ठार झाल्याची घटना बेळगाव जवळील अलारवाड येथे घडली आहे.
शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अप्पणा जिन्नप्पा शंकरगौडा वय 55 वर्षे असे या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे.
शनिवारी सकाळी ते जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते त्यावेळी गवताच्या भाऱ्यातील पेंडीचा स्पर्श विद्युत भारित तारेला झाल्याने सदर शेतकरी घटनास्थळीच करंट लागून ठार झाला आहे.
अलारवाड गावाजवळील शेतातून अनेक विद्युत खांबांच्या वाहिन्या खाली आल्या आहेत याची तक्रार शेतकऱ्यांनी अनेकदा हेस्कॉम कडे केली होती मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.जर विद्युत वाहिन्या दुरुस्त झाल्या असत्या तर अश्या घटना टाळता आल्या असत्या त्यातच पावसात अनेक ठिकाणी शेतात धोकादायक वाहिन्या आहेत याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.