बेळगावच्या पोलीस आयुक्त सीमा लाटकर यांनी काल कुद्रेमनी येथील मटका आणि जुगाराच्या क्लबवर धाड टाकली. तेथे ४ लाखाहून अधिक रक्कम, ४४ मोटारसायकली, ५ कार जप्त केल्या आणि ४० जुगाऱ्यांना त्यांनी जेरबंद केले आहे. या कारवाईने सीमा लाटकर या लेडी सिंघम ठरल्या आहेत.
आज प्रसिद्ध झालेल्या सर्वच वृत्तपत्रातील बातम्यांनी सीमा लाटकर यांच्या या कारवाईचे समर्थन केले आहे. मागील सहा ते आठ महिन्यापासून सुरू असलेल्या या क्लब वर धाड टाकणे हे अतिशय जिकिरीचे आणि धोक्याचे काम होते, धाड टाकल्यावर ३० ते ३५ जण पळून गेले म्हणजेच एकूण १०० लोक त्या क्लबवर होते. पण सीमा लाटकर यांच्या नेतृत्वखालील फक्त १५ जणांच्या टीमने ४० जणांना अटक करून ठेवले होते. यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला तर सीमा लाटकर यांनाही धोका होताच पण भीती वाटून न घेता त्यांनी थांबून राहून या क्लब मध्ये असलेल्या जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
मटका किंवा जुगार या गोष्टी पैसे मिळवून देण्यात पण ते क्लब चालवणाऱ्यांना. बाकीचे या गोष्टीत गुंतले की त्यांचे संसार उघड्यावर पडतात. यामुळेच या धंद्याला बेकायदेशीर मानले जाते. तरीही अशे क्लब आणि अड्डे चालविले जातातच.
डीसीपी सीमा लाटकर यांना या क्लबची माहिती मिळताच त्यांनी फक्त निवडक १५ जणांची टीम तयार केली होती. या टीमला घेऊन त्या रिक्षाने कुद्रेमानीला गेल्या होत्या. जुगारी आणि क्लब चालकांना अंदाज हेऊ नव्हे म्हणून त्यांनी अतिशय गुप्तपणे क्लबला वेढा घातला. आणि पुढची कारवाई केली आहे.
शहरात या महिला अधिकारीची स्तुती होत आहे. हा अड्डा धाड टाकून बंद केल्यामुळे हजारो महिलांचे आशीर्वाद त्यांना मिळाले आहेत.