शिवभक्ती ही दाखविण्यासाठी नसून ती आचरणात आणण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या राष्ट्र पुरुषांची भक्ती करतच असतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्तीचा महिमा सांगावा तेवढा कमीच आहे. याला सरकारी अधिकारीही अपवाद नाहीत. त्यामुळे अधिकारी जरी कर्नाटक सरकारचे असले तरी भक्ती मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांवरही करतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपदेशाचे अनुकरण होताना दिसत आहे.
तालुका पंचायतमध्ये एक अधिकारीही शिवभक्त असून त्यांनीही कधी जात, भेद आणि मतभेद केले नाही. त्यामुळे त्यांच्या टेबलवर शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. आणि या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची ते सदैव प्रेरणा घेऊनच कामाला सुरुवात करतात.
तालुका पंचायतीचे सहाय्यक सचिव मल्लिकार्जुन कलादगी असे त्या शिवभक्त अधिकाऱ्या चे नाव आहे. त्यांनी आपल्या टेबलवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवला आहे. ते सांगतात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका जाती किंवा पंथाचे राजे नसून ते साऱ्यांचेच आराध्यदैवत आहेत. त्यांनी केलेले कार्य हे अनेकांना प्रेरणा देणारे आहे. या राष्ट्र पुरुषाच्या विचारांची आज देशाला खरी गरज आहे.
नव्या पिढीला महाराज्यांबद्दल काय सांगाल? या प्रश्नावर त्यांनी खूप सुंदर उत्तर दिले आहे. कपाळावर भगवा किंवा वाहनावर भगवा लिहिल्याने त्यांचे विचार मनामनात रुजत नाहीत. तर त्यांच्या विचारांचे अनुकरण केल्यावर देशातील युवा पिढीत मोठा बदल घडू शकतो. काहीजण राज्यांचे राजकारण करून सोईचे राजकारण करत असून त्यांच्या नावाची पोळी भाजून घेत असतात. मात्र ज्या व्यक्तीने राजे ओळखले तर ते देश बदलू शकतात. त्यामुळे राजांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याची आज गरज आहे. असे त्यानी सांगितले.