‘बकरी ईद वेळी पशु बळी देऊ नका पशु बळी दिल्यास देव नाराज होईल’ अस मी म्हटलेलंच नाही असा खुलासा जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी केला आहे.सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात बकरी ईद निमित्त झालेल्या शांतता सभेत ईद वेळी पशु बळी देऊ नका. बळी दिल्यास देव नाराज होईल’ अस आवाहन केल्याचे काही माध्यमांनी म्हटलं आहे मात्र असे कोणतेही वक्तव्य केलेलं नसल्याचे स्पष्टीकरण जिया उल्ला यांनी केला आहे.
मंगळवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले असून बकरी ईद पशु बळी या सगळ्या धार्मिक पालन करणाऱ्या गोष्टी आहेत कोणत्याही धर्माचा कोणताही सण असुदेत कायदेशीर चौकटीत साजरा करा असे आवाहन करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे. पशु बळी दिल्याने देव नाराज होईल असं कधीच म्हटलं नसल्याचा पुनरुच्चार केला.
कोणताही सण साजरा करताना अन्य धर्मियांना याचा त्रास होऊ नये त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नये शांततेत सौहार्दपूर्ण वातावरणात सण साजरे झाले पाहिजेत असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.