क्लब रोडवर कार पार्क करत असाल तर तीस रुपये तयार ठेवा. हा तीन तास कार पार्किंगचा दर आहे. बेळगाव महानगरपालिकेने हा दर निश्चित करून आजपासून क्लब रोडवर पे पार्किंग सुरू केले आहे.
सिव्हिल हॉस्पिटल च्या गेट पासून बी शंकरानंद यांच्या घरापर्यंत कार लावणाऱ्या प्रत्येकाला आता पार्किंगचे शुल्क भरावे लागणार आहे. एक वॉर्ड क्लार्क आणि एक अटेंडरची नेमणूक करण्यात आली आहे. फी स्वीकारून डिजिटल स्लिप देण्याचे काम ते करीत आहेत.
मनपाने एक ठराव करून ठराविक रस्त्यांवर पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. रामलिंग खिंड गल्ली येथून या अंमलबजावणीस सुरुवात झाली पण स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने तेथे ही योजना बारगळली आहे, आता क्लब रोडवर पार्किंग शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे.
तीन तासाला तीस रुपये हा दर जास्त आहे. तीस रुपयात किमान सात ते आठ तास कार पार्किंग करण्याची सुविधा मिळने गरजेचे आहे. एक दोन तास गाडी लावायला दहा रुपये ठीक आहे, मात्र अर्धा तास गाडी लावली तरी तीस रुपये घेणे हा निर्णय चुकीचा आहे, असे कारमालक म्हणत आहेत.
अनेकांनी बेळगाव live कडे आपली ही भूमिका मांडली. पे पार्किंग सुरू करण्याचा ठराव करणाऱ्या नवरसेवकांनी इतका मोठा दर आकारून नागरीकांची लुबाडणूक करण्याचा निर्णय घेतलाय की काय, असे मत अनेकजण व्यक्त करत होते.