प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायन मिश्रित रंग केलेल्या गणेश मूर्तीवर यंदाही बंदी आणण्याचा निर्णय बेळगाव जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या शिवाय बेळगाव बाहेरील जिल्ह्यातून पी ओ पीच्या गणेश मूर्ती आणून विकण्यावरही कारवाई करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वरील माहिती देण्यात आली आहे.पी ओ पी मूर्ती बनवू नका जर बनवल्या असतील तर कायदेशीर कारवाई केली जाईल बाबत शहरातील गणेश मुर्तीकाराना कल्पना देण्यात आली आहे असेही पत्रकात म्हटलं आहे.
सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पी ओ पी गणेश मूर्ती बनवणे विक्री याबत सविस्तर माहितीसाठी विशेष बैठक बोलावली होती.
कायद्याचं उल्लंघन न होता गणेश मूर्ती बनवल्या जाव्यात याबाबत दक्षता घ्या अश्या सूचना जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी महा पालिकेचे अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.मुर्तीकाराना जास्तीत जास्त शेडूच्या गणेश मूर्ती बनवायला प्रवृत्त करा अश्या सुचना देखील त्यांनी दिल्या आहेत.पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी मिळून गणेश मुर्तीकाराकडे भेट देऊन पी ओ पी मूर्ती बनवलेत की शेडूच्या याची पहाणी करा आणि जर मुर्तीकारानी पी ओ पी मूर्ती बनवल्या असतील तर त्या जप्त करून एका ठिकाणी ठेवा असा आदेश देत कुणालाही पी ओ पी गणेश मूर्ती बनवायला दिली जाणार नाही अस देखील स्पष्ट केलंय.
कुणीही मूर्तिकार पी ओ पी मूर्ती करताना सापडल्यास त्यांच्या कारवाई करा असा देखील आदेश सर्व पोलीस स्थानकांना देखील सूचना देण्यात आला आहे.
नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने गणेश मूर्ती बाबत सहकार्य करावे अशी विनंती गणेश महामंडळ करणार आहे शहरात गणेश उत्सवात कश्या पद्धतीने पर्यावरण प्रदूषण होणार नाही याचं अहवाल बनवून आम्ही प्रशासनास विनंती करणार आहोत लवकरच याबाबत महा मंडळ पदाधिकारी बैठक घेऊन निवेदन देऊ अशी प्रतिक्रिया गणेश महा मंडळाचे पी आर ओ विकास कलघटगी यांनी बेळगाव live कडे दिली.