खानापूर कृषी पत्तीनं सहकारी पथ संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीने विकास पॅनलचा एकतर्फी पराभव केला आहे.
खानापूर प्राथमिक कृषिपत्तीन सहकारी संघाच्या निवडणुकीचा निकालात शेतकरी सहकारी विकास आघाडीचे १२पैकी ११उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत.या निवडणुकिसाठी रविवारी अत्यंत चुरशीन मतदान झालं होतं.
संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातील जनेतेचे लक्ष लागून राहिलेल्या तालुक्यातील सर्वात मोठ्या सहकारी बँकेच्या निवडणूक निकालाकडे लक्ष होते.बँकेच्या भागधरकांनी त्यांच्या केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून पुनश्च जुन्या संचालकांवर विश्वास व्यक्त केलाय आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांचे नेतृत्व नाकारले या सह या निवडणुकीत प्रचारादरम्यान माजी आमदारांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे ठरविलेले आहेत अशी भावना विजयी उमेदवारानी बोलून दाखवली.
माजी आमदार अरविंद पाटील यांनी शेतकरी विकास पॅनल तर समितीच्या दिगंबर पाटील यांच समर्थन असलेल्या नारायण कारवेकर गटाने शेतकरी विकास आघाडी साठी जोरदार शक्ती पणाला लावली होती त्यामुळं अरविंद पाटील यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे.शेतकरी सहकारी पॅनल ला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.विजयी उमेदवारमध्ये नारायणराव कार्वेकर ,महादेव नाईक,नारायण पाटील,नारायण लाड सत्ताधारी पॅनल मधून शंकर पाटील,परशुराम ठोंबरे,सुरेश सुळकर ,अमृत शिपुरकर यांच्यासह एक महिला संचालिकेने संस्थेत एन्ट्री घेतली आहे