Wednesday, January 22, 2025

/

‘मारवाडी युवा मंचचे स्वच्छ बिन’

 belgaum

वाहनातून फिरताना कचरा थेट रस्त्यावर फेकला जातो हे प्रकार टाळण्याबद्दल जागृतीसाठी मारवाडी युवा मंच या संस्थेने स्वच्छ बिन हे नवे कारमध्ये ठेवण्यासाठीचे कचरा कुंड तयार केले आहेत. बेळगावमध्ये हे बिन मोफत वाटण्यात येत आहेत.

गोवा राज्याच्या राज्यपाल मृदुला सिंन्हा यांनी या संस्थेची स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रँड अंबसिडर पदी नेमणूक केली आहे. २३ ऑगस्ट २०१७ रोजी ही निवड झाली.हे अभियान २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झाले. महात्मा गांधी यांच्या १४५ व्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची सुरुवात केली. २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण भारत स्वच्छ करण्याचे हे ध्येय आहे.

Marwadi yuva manch
या ध्येयात हातभार लावण्यासाठी हे पाऊल उचलून सर्व कार चालकांना हे बिन मोफत वाटले जात आहेत. प्रत्येक सिग्नल वर जाऊन हे बिन देऊन जागृतीचे काम सुरू आहे.
१५ ऑगस्ट पासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.बेळगावचे नागरिक आपण प्रवास करताना कचरा रस्त्यावर न फेकून सहकार्य करावेत आणि हा कचरा या बिन मधुनच टाकावा अशी अपेक्षा आहे.
मारवाडी युवा मंच ने सदर बिन डी सी पी गुन्हे महानिंग नंदगावी यांना भेट दिले यावेळी गोपाल उपाध्याय,अजय हेडा, विक्रम पुरोहित, संतोष व्यास,रामेश्वर भाटी, भरत पुरोहित आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.