सुंडीत सध्या निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत असते. निसर्गाचे सौदर्य पाहणाऱ्यांची गर्दी होताना पाहून त्यांची लूट करण्याचे प्रकारही काही कमी नाहीत. याचाच फायदा पाहून सुंडीत लुटण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत, अशी तक्रार होत आहे.
१५ आगस्टच्या दरम्यान काही तरुणांनी सुंडीच्या धबधब्यावर पार्किंगसाठी पैसे आकारण्याचे प्रकार घडले आहेत. अनेकांकडून पार्किंग साठी ही लूट करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली असून जाणूनबुजून हा प्रकार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पार्किंगसाठी सुमारास १० ते २० रुपयाची आकारणी करण्यात येत आहे.
पार्किंग आकारणीसाठी १५ ऑगस्ट हा दिवस निवडण्यात आला होता कारण या दिवशी मोठ्या प्रमाणात निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होते. याचा फायदा घेऊन ही आकारणी करण्यात आली आहे.
काही तरुणांनीच ही आकारणी केली आहे की याला ग्राम पंचायतीने होकार दिला आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे. कधीकाळी येथील धबधब्यावर गर्दी नसताना याचा महिमा वाढविण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केल्यानंतर येतील सुंडीत गर्दी वाढू लागली मात्र आता येथेही पार्किंग कर आकारून लूट सुरू असल्याचे दिसून येत आहे.
नागरिक येतात मात्र पर्यटन स्थळाच्या जीवावर अशी लूट करणे किती योग्य आहे असे प्रश्न निर्माण होत असून स्थानिक यंत्रणांनी हे प्रकार बंद करावेत अशी मागणी वाढली आहे.