वडगांव अनगोळ रोड वर पावसाने रस्त्यात मोठं मोठे खड्डे पडले होते प्रशासनाला कित्येकदा विनंती करून देखील दुरुस्ती होत नसल्याने संतापलेल्या लोकांनी श्रमदानातून आपापल्या घरा समोरील खड्डे बुझवले आहेत.
वडगांव मधून अनगोळ कडे जाणाऱ्या रोड वर रहदारी वाढली आहे वाळू घेऊन ये जा करणाऱ्या गाड्या देखील याच मार्गाचा अवलंब करत आहेत परिणामी या रस्त्यावर मोठं मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
यल्लप्पा शहापुरकर, डी एल टपाले,सिद्धांनी सर आदींनी श्रमदान करून मोठे खड्डे बुझवले आहेत.गेल्या दीड वर्षापूर्वी पालिकेच्या एस एफ सी फंडातून या रस्स्त्याचे डामरीकरणं करण्यात आले होते मात्र केवळ दीड वर्षात म्हणजे ठेकेदारांची मुदत संपायच्या अगोदरच रस्ता खराब झाला आहे.ठेकेदार पी एम पाटील यांनी हे काम केलं आहे.
रस्त्याच्या मुदती अगोदर रस्ता खराब झाल्याने ठेकेदार रस्ता दुरुस्त करून देईल का? असा प्रश्न विचारला जात आहे.पालिका आयुक्त काम बरोबर न केलेल्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये घालू अशी वल्गना करतात त्यांना वडगांव अनगोळ रोड वरचे खड्डे दिसतात की नाही अशी विचारणा वाहन धारक करताहेत.