वाजपेयीजी गेले आणि त्यांच्या आठवणी येऊ लागल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या माध्यमातून काम करणाऱ्या बेळगावातील कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अनेक आठवणी आहेत.
एकदा अटलजी निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने हुबळीला आले होते तेंव्हा त्यांचा हार काही कार्यकर्त्यांनी प्रयत्नपूर्वक बेळगावला आणला होता, त्या आठवणीतल्या हाराची गोष्ट त्या कार्यकर्त्यांनी बेळगाव live ला सांगितली आहे.
हुबळी येथे वाजपेयींची भव्य सभा झाली होती.हुबळी ला संजय सव्वाशेरी, विश्वनाथ सव्वाशेरी, श्रीधर सव्वाशेरी, अनील पाळेकर, उमेश कल्लेद, सध्या तरुण भारत चे मुख्य पत्रकार असलेले गिरीश कल्लेद, अच्युत कुलकर्णी सह काही जण ट्रॅक्स करून त्या सभेला गेले होते.
वाजपेयींची सभा झाली, त्या सभेत त्यांना भव्य असा गुलाबाच्या फुलांचा हार घालण्यात आला होता. वाजपेयींच्या शरीराला लागलेला तो हार आणण्यासाठी
श्रीधर सव्वाशेरी, विश्वनाथ सव्वाशेरी ,उमेश कल्लेद व अनील पाळेकर यानी प्रयत्न केले होते. त्यांनी तो हार आणायचे ठरवीले आणि विश्वनाथ व श्रीधर पूढे गेले असता वाजपेयींची सुरक्षेसाठी तैनात कमांडोने श्रीधर ला बंदूक रोखून अडवले आणि म्हणाला क्याहैबे?
यासाऱ्यांनी त्याला विनंती केल्याने व सर्वाना पाहुन , सर्वांचे धाडस पाहुन हार नेण्यास त्याने अनुमती दिली आणि तो हार मिळाला.
हार वजनाने भक्कम होता, तो गाडीवर घालण्यात आला, येताना सर्वजण अभिमानाने बघत होते,
आणि तो हार बेळगांवला सव्वाशेरी यांच्या घरी १० ते १२ दिवस ठेवला होता. रोज संघाचे स्वयंमसेवक ते बघायला येत होते आम्हाला एकतरी फुल द्या म्हणून विनंती करत होते.