निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अटलबिहारी वाजपेयी यांनी बेळगावला अनेकदा भेट दिली आणि त्यांच्या सभा अविस्मरणीय ठरल्या.
पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांची युनियन जिमखान्यावर झालेली सभा गर्दीचा उच्चांक मोडणारी ठरली होती.बेळगाव बरोबरच प्रचाराच्या निमित्ताने अटलबिहारी वाजपेयी यांनी रामदुर्गला देखील भेट देऊन तेथे भोजनाचा आस्वाद देखील घेतला होता.हलगत्ती येथील साईचे दही ,वांग्याची भाजी,कोरट्याची चटणी आणि कडक भाकरी यांचा आस्वाद घेतला होता.
१९८२ मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक होती.त्यावेळी भाजप हा ब्राह्मणांचा पक्ष अशीच इमेज होती.त्यामुळे भाजपला उमेदवार मिळणे अवघड झाले होते.पुढे होऊन कोणीही भाजपची उमेदवारी स्वीकारण्यास तयार नव्हते.त्यावेळी बेळगाव जिल्ह्यात भाजपने बारा उमेदवार रिंगणात उतरवले होते.
रामदुर्गमधून मारुती यंकाप्पा चंदरगी उभे होते.त्यांच्या प्रचारासाठी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी रामदुर्गला अंब्यासेडर कारमधून आले होते.यावेळी त्यांची भोजनाची व्यवस्था सोमनट्टी यांच्या बंगल्यात करण्यात आली होती.यावेळी हलगत्ती येथील साईचे दही,तेलावर परतलेल्या वांग्याची भाजी,कोरट्याची चटणी आणि कडक भाकरी असा मेनू होता.अत्यंत आवडीने वाजपेयी यांनी या मेनूचा आस्वाद घेतला होता अशी आठवण मारुती चंदरगी यांनी सांगितली
-विलास अध्यापक महाराष्ट्र टाईम्स
बेळगाव