विद्यार्थी जीवन व सामाजिक जीवनात आलेल्या अनेक अडचणींवर मात करुन शिक्षण घेतां येते हे सिध्द करुन दाखवलेल्या आंबेवाडी (ता.बेळगाव ) येथील रोहन पास्ते याला डाॅ. सरनोबत दांपत्यांकडुन ५००००₹ ची भरीव आर्थिक मदत करण्यात आली आहे . एमएस्सी नॅनोसायन्स करुन पुढेवैज्ञानिक संशोधन करण्यासाठी पी.एच.डी.पदवी घेण्यासाठी तैवान येथे निघालेल्या रोहनला आर्थिक मदतीची नितांत गरज होती , यासाठी डॅा.समीर व डॅा.सोनाली सरनोबत यांनी मोलाचा हात दिला आहे .
नॅशनल चाओ-तुंग विघ्यापीठ सिंचु तैवान येथुन त्याला पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले असुन शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर येथुन त्याने एमएस्सी पदवी प्राप्त केली आहे . त्यांचबरोबर एन आय टी कर्नाटक सुरतकल येथुन एक वर्षाचा संशोधनीय प्रकल्प देखील केला आहे .
पेरोव्हसकाईट सोलार सेल्स या विषयावर त्याने संशोधन केले असुन आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कार्यशाळांमध्ये त्याने आपले प्रबंध सादर केलेले आहेत . गरिबीतून वर येण्यासाठी शिक्षणाची कास धरली पाहिजेत हे त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
याआधी देखील रोहनने सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग दर्शविला असुन फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन आॅफ इंडिया या संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये तो युवा सदस्य म्हणुन कार्यरत आहे . सदर पीएचडी अभ्यासक्रमासाठी डाॅ. सरनोबत दांपत्य पुढे आले असुन यामुळे रोहनची आर्थिक बाजु सक्षम होण्यास मदत होणारं आहे .