माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व थोर होते. त्यांच्याबद्दल किती बोलेल तितके कमी आहे. बेळगावच्या माजी नगरसेविका लालन प्रभू यांनीही आपल्या संस्मरणीय आठवणी बेळगाव live कडे शेअर केल्या आहेत.
ज्येष्ठ व्यक्तिमत्व शरद पवार यांच्याबरोबर जाऊन बेळगावच्या समितीच्या शिष्टमंडळाने अटलजींची भेट घेतली होती. तत्कालीन आमदार बी आय पाटील, कै वसंत राव पाटील जी एल अष्टेकर, वाय एस पिंगट यांच्या सोबत लालन प्रभुही गेल्या होत्या.
१९९८ साली ही भेट झाली होती.
सगळीकडे त्यांचे अनुभव सांगितले जात आहेत. मी एक लहान व्यक्ती आहे. मात्र त्यांना भेटलेला तो मोठा दिवस आजही आठवणीत आहे, त्या शिष्टमंडळात मी एकमेव महिला होते, आम्ही आमच्या समस्या मांडल्या, त्या अटलजींनी शांतपणे ऐकल्या, मी एकही शब्द बोलू शकले नव्हते, पण त्यांना भेटण्याचा त्यांच्या समोर उभे राहण्याची अनुभव मोठा होता, तो अनुभव जन्मभर लक्षात राहील.
त्यांच्यासारखे राजकीय व्यक्तिमत्त्व मी आजपर्यंत बघितले नाही. लालन प्रभू यांचे हे शब्द आहेत.