शहर परिसरात दुचाकी वाहने चालवणाऱ्या वाहन धारकाना त्यांच्या गाडीची नंबर प्लेट व्यवस्थित आहे की नाही हे आधी तपासावे लागणार आहे कारण बेळगाव पोलीस गाडीची नंबर प्लेट व्यवस्थित नसणाऱ्या दुचाकींवर कारवाई करत आहेत.
गुरुवारी शहरातील रहदारी आणि अन्य पोलीस स्थानकांनी याबाबत विशेष मोहीम राबवली आहे शहरातील बहुतांश पोलीस स्थानका समोर दुचाकी मोठ्या प्रमाणात पार्क केल्याचे चित्र होते.
पोलिसांनी एका दिवसात बेळगाव शहरातील व्यवस्थित नंबर प्लेट नसलेल्या जवळपास 268 दुचाकींवर कारवाई केली आहे.शहर उत्तर आणि दक्षिण रहदारी पोलिसांनी 118 दुचाकींवर तर शहरातील सर्व पोलीस स्थानकांनी मिळून 150 दुचाकींवर कारवाई करत दंड वसूल केला आहे.
नंबर प्लेट मोहीम पुढेही सुरू राहणार असून अनपेक्षित रित्या एक दिवस ठरवून कारवाई केली जाणार असल्याची माहिती रहदारी पोलिसांनी दिली आहे. तर गुरुवारी कारवाई केलेल्या सर्व दुचाकींना नवीन नंबर प्लेट घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर कागदपत्रे तपासून त्या प्रमाणे दंड आकारण्यात आला असल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय.