सगळ्यांना सांभाळून घेऊन जाणारा नेता ही वाजपेयींची खरी ओळख. बेळगावच्या सीमाप्रश्नातही वाजपेयींन्नी योगदान दिले आहे. त्या योगदानाच्या काही आठवणी सांगितल्या आहेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी.
सीमाप्रश्न सुटावा यासाठी वाजपेयींन्निही प्रयत्न केले आहेत. विरोधी पक्षीय शिष्टमंडळाने १९७३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली होती. सह्याचं निवेदन देऊन सीमाप्रश्न तत्वाने सोडवा अशी मागणी केली होती. स्वतः अटल बिहारी वाजपेयी यांनी यामध्ये प्रमुख भूमिका निभावली होती.
१९७० साली महाजन अहवाल जेंव्हा लोकसभेत ठेवण्यात आला तेंव्हा म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटकाच्या खासदारांनी लोकसभेत गोंधळ केला होता तेंव्हा वाजपेयींन्नी समंजस्याची भूमिका घेऊन सगळ्यांना शांत केलं होतं.
२००४ साली पंतप्रधान असताना मुख्यमंत्र्याच्या परिषदेत कर्नाटकाचे मुख्यमंत्री एस एम कृष्णा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख या दोघांनाही वाजपेयींन्नी सीमाप्रश्नाच्या चर्चेसाठी बोलावलं होतं.परंतु कोणतीही कल्पना न देता कृष्णा दिल्लीतून पळून आले होते.
वाजपेयीजी सारखे नेते विरळच असतात, असे मालोजीराव अष्टेकर यांनी बेळगाव live कडे सांगितले आहे.