ढिसाळ नियोजनामुळे राष्ट्रध्वजच वेळेवर न फडकल्याची घटना आज बेळगाव मध्ये घडली.बुधवारी सकाळी १५ अॉगष्ट रोजीच्या ध्वजारोहण प्रसंगीच हा ढिसाळपणा घडल्यामुळे जिल्हा प्रशासानाचे वाभाडे निघाले.
आज दरवर्षी प्रमाणे नेहरू स्टेडियमवर जिल्हा प्रशासनातर्फे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री रमेश जारकीहोळी आले होते त्यांनी परेडच निरीक्षण केलं शानदार पथ संचलन झालं मात्र नेमकं ध्वजा रोहणावेळी ढिसाळ नियोजना मुळे ध्वज वेळेत फडकू शकला नाही.
ज्यावेळी पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे ध्वजा रोहणा साठी पुढे आले त्यावेळी पोलिसांनी झेंड्याला सालामीची घोषणा केली उपस्थित सर्वांनी सॕल्युटसाठी हाथ वर केले मात्र पालकमंत्र्यानी ध्वजारोहणाची दोरी ओढल्यानंतर काही केल्या ध्वज काही फडकत नव्हता. बराच वेळ ध्वज मध्येच लटकलेला होता. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. एवढ्यात एका पोलिसाने तो अर्ध्यावर असलेला ध्वज खाली उतरवला आणि पुन्हा आपणच ओढत परत फडकवला. हे सगळं होईपर्यंत सर्वांचेच हात सॕल्युटसाठी वर होते.
उपस्थित सर्वांमध्ये ह्या ढिसाळपणाची चर्चा रंगली होती.जिल्हा प्रशासनाच्या या ढिसाळपणाबद्दल उपस्थित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वास्तविक राष्ट्र ध्वज व्यवस्थित रित्या फडकावणे गरजेचे असते राष्ट्रध्वज नीती संहिते मध्ये तसे आहे मात्र बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे असे घडले होते.
पहा ध्वजा रोहणाचा व्हीडिओ करा खालील लिंक क्लिक
https://m.facebook.com/story.php?story_fbid=206693253535086&id=375504746140458