केवळ फक्त सर्प पकडण्यावर न थांबता सर्पविषयीची भिती अज्ञान दूर करून सर्प मानवाचा मित्र आहे त्याला मारू नये असे समाजात रुजवून पर्यावरणाची सेवा सर्पमित्र दाम्पत्यांनी केले आहे त्यांचा आदर्श समाजाने घ्यावा असे गौरवोद्गार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळळी यांनी काढले.
येळ्ळूर येथे सर्प वैज्ञानिक प्रबोधन या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी येळ्ळूरचे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र पाटील होते.सर्प मित्र आनंद चिट्टी निर्झरा चिट्टी यांनी खास नाग पंचमी निमित्य सर्प प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी गोपाळराव बिर्जे महादेव पाटील यांची समयोचित भाषणे झाली. भगत सिंग प्रतिमेला मालार्पण करून सर्प प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आता पर्यंत आनंद चिट्टी यांनी 13 हजार हुन अधिक सापांना जीवनदान दिले आहे या वर्षी पहिल्यांदाच त्यांनी सर्प प्रदर्शनाचे आयोजन केले होते.नाग ,घोणस या विषारी सर्पासह धामण, तस्कर, वेरुळा, कवड्या हे मानवी वस्तीत वाचविलेले सर्प प्रदर्शनात ठेवले होते.
विषारी बिनविषारी सर्प,सर्प दंश, विषाची लक्षणे, सर्पदंश कसे टाळावेत, प्रथमोपचार ,सर्प मानवाचा मित्र कसा यावर फलकाद्वारे माहिती देण्यात आली प्रत्यक्ष निर्झरा व आनंद चिठ्ठी यांनी प्रेक्षकांचे शंका समाधान केले शिवराज युवक मंडळ, परिवर्तन ग्रुप, मानव बंधुत्व वेदिके, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठा जागृती निर्माण संघ, जायंट्स ग्रुप, रोटरी क्लब व नवहिंद परिवार यांच्या सहभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता 5 हजार लोकानी या
प्रदर्शनास भेट दिली.