आज सारे जग स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना खानापूरात स्वातंत्र्यासाठी लढून प्राणांची आहुती दिलेल्या योध्याचा जन्मदिन साजरा करण्यात आला.
ब्रिटिशांशी पहिल्यांदा दोन हात केले ते क्रांती वीर संगोळी रायांण्णा यांनी… कित्तूरच्या राणी चनम्मा यांचा हा वीर सेनापती त्याला ब्रिटिशांनी फासावर लटकावले होते असा इतिहास आहे.
आज १५ ऑगस्ट हा त्याचा जन्मदिन…एक आमदार म्हणून पहिल्यांदाच खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी तो साजरा केला. नंदगड येथे त्यांच्या समाधी स्थळी जाऊन त्यांनी या योध्यास अभिवादन केले. पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते