Thursday, January 2, 2025

/

बेळगावातील भक्ताला गणपतीने दिला दृष्टांत

 belgaum

श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबद्दल अनेकांची अनेक मते आहेत. काहिजण देवभक्तीलाही अंधश्रद्धा म्हणतात तर अनेकजण देवालाच मानत नाहीत. प्रत्येकाची भावना महत्वाची मानल्यास बेळगावातील गणेश भक्ताला आलेला हा अनुभवही मानावाच लागेल. या भक्ताला गणपतीनेच दृष्टांत दिला आहे. आता आपल्या घराशेजारीच दृष्टांतात दिसलेल्या त्या गणपतीची मूर्ती स्थापून तो मंदिर उभारण्यात गुंतला आहे.
एपीएमसी जवळच्या मार्कंडेय नगर येथील रहिवासी मल्लिकार्जुन गुरुसिद्धाप्पा सत्तीगेरी यांच्या बाबतीत ही घटना घडली आहे. सत्तीगेरी हे वरद विनायकाचे भक्त आहेत. प्रत्येक महिन्याला किमान एक दोन वेळा रेड्डी येथील गणपतीचे दर्शन ते घेतातच. मागील १५ ते २० वर्षांपासून त्यांनी ही प्रथा पाळली आहे. देवाची आठवण आली की मी सुटतोच आणि दर्शन घेऊन परत येतो, हा परिपाठ आपण कधीच चुकवला नाही अशी माहिती त्यांनी बेळगाव live ला दिली.

Swayambhu
मागील एक दोन महिन्यात मात्र त्यांना रेड्डी ला जाऊन गणपतीचे दर्शन घ्यायला जमले नाही. आपल्या उपासनेत खंड पडला होता. कामाच्या निमित्ताने जायचेच राहून जात होते पण मनाला शांती मिळत नव्हती. आपण आपली ही भावना गणपतीला मनातल्या मनात बोलून दाखवली…. आणि स्वप्नात दृष्टांत होऊ लागले, सत्तीगेरी सांगत होते.

Gnesh devoteee
आठ ते दहा वर्षांपूर्वी रेड्डी जवळील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गोटॉस जवळ अरण्यात त्यांना वरद विनायकाचे रूप असलेले एक दगडी शिल्प दिसले होते. स्वप्नात त्यांना तेच दगडी शिल्प आणि गणपतीचे रूप पुन्हा पुन्हा दिसू लागले. म्हणून भटजींचा सल्ला घेऊन त्यांनी त्याच जागी जाऊन ते दगडी शिल्प मिळते का हे शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ते पुन्हा दिसले.
तेंव्हा ते वरद विनायकाचे रूप असलेले दगडी शिल्प घेऊन येण्याचा निर्णय घेतला. आपल्या घरी आणून त्याचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला.
भाजप नेेते भाजप नेते शंकगौडा पाटील, किरण जाधव आदी भाजप नेते आणि मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत या गणेश भक्ताने या मंदिराचे भूमीपूजनही केले आहे, आता ते मंदिर पूर्ण करूनच स्वस्थ बसणार आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.