गुजरात भवन येथे आज आंतरशालेय देशभक्ती गायन स्पर्धा घेण्यात आली. रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव आणि इंटेरेक्ट क्लब ऑफ गजाननराव भातकांडे स्कुल तर्फे आयोजित आणि नवरात्र उत्सव मंडळ गुजरात भवन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली.
२००३ पासून दरवर्षी ही स्पर्धा भरविली जाते. यावर्षी १९ शाळांनी भाग घेतला होता.रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे असिस्टंट गव्हर्नर डॉ सतीश धामणकर यांनी उद्घाटन केले.
रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामचे अध्यक्ष अभिजित शाह अध्यक्षस्थानी होते. सेक्रेटरी संजीव देशपांडे, इव्हेंट चेअरमन जिनप्रसाद चिवटे, संचालक प्रसाद कट्टी, प्राचार्या दया शहापुरकर, इट्रॅक्ट क्लब अध्यक्ष श्वेता देशपांडे, सेक्रेटरी हर्षिता सोनालकर, मार्गदर्शक शिक्षिका रूप गुरव व सुमन मोरे हे उपस्थित होते.
प्रेरणा भंडारी व स्फुर्ती बाळीकाई हे सुत्रसंचालक होते.
गजाननराव भातकांडे स्कुलचे चेअरमन मिलिंद भातकांडे यांच्याहस्ते विजयी टीमना बक्षीस वितरण झाले. परीक्षक अरुण कामुले व प्रभाकर शहापुरकर होते.
निकाल पुढीलप्रमाणे शहरी भाग
प्रथम :लिटल स्कॉलर अकादमी कणबर्गी रोड
द्वितीय: सरदार हायस्कुल
तृतीय: मराठी विद्या निकेतन
ग्रामीण
प्रथम: सरस्वती हाय स्कुल हंदीगणुर
द्वितीय: रंकुंडये हायस्कुल
तृतीय: वाघवडे हाय स्कुल
तर उत्तेजनार्थ बक्षीस:ज्ञान प्रबोधन मंदिर