सव्वीस वर्षीय नरधामाने तेरा वर्षीय बालिकेला पडक्या घरात नेऊन बळजबरीने बलात्कार केल्याची घटना भारतनगर येथे घडली आहे. आनंद सिद्धप्पा गोल्लर वय 26 रा.भारतनगर खासबाग असे अल्पवयीन मुलींवर बलात्कार केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना मागील आठवड्यात 8 आगष्ट रोजी घडली असून त्या दिवशी दुपारी तीनच्या दरम्यान सदर मुलीचा हात पकडून भारतनगर येथील एका पडक्या घरात नेऊन तिच्यावर बळजबरी केली होती या घटनेनंतर रविवारी तिच्या पालकांनी पोलिसात फिर्याद दाखल केली होती.जिल्हा सिव्हिल इस्पितळात त्या मुलीची तपासणी झाली आहे.शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी अधिक तपास करत आहेत.
महिला संघटनेची मागणी
बलात्कार झालेल्या पीडित विद्यार्थिनीला एक लाखांची नुकसान भरपाई द्या अन्यथा यमकनमर्डी पी एस आय आणि हवालदार यांना निलंबित करा अशी मागणी भारतीय सहारा महिला संघटनेने केली आहे.या संस्थेच्या अध्यक्षा मिलन राजपूत यांनी अतिरिक्त एस पी रवींद्र गडादी यांना निवेदन देऊन केली आहे.
हुक्केरी तालुक्यातील हळूगुडनट्टी येथील एका 15 वर्षीय विद्यार्थीनी वर 28 जुलै रोजी संशियत आरोपीआप्पाजी भरमा डयरागोळ बलात्कार केला होता मात्र पोलिसांनी मुलीची वैधकीय तपासणी केली नाही पीडितचे कपडे देखील जप्त केले नाहीत. अस निवेदनात म्हंटल आहे.