युनियन जिमखान्या समोरील चंदगड बस स्टॉप वरील लोकांची गर्दी…अनेक विद्यार्थी घरी जाण्यास बसची वाट पाहताहेत त्यातच पावसाची रिपरिप अश्यात उंच जुनाट नारळाचे झाड हाय टेन्शन विद्युत भारित तारांवर कोसळल्याने सर्वांचीच तारांबळ उडाल्याची घटना जिमखान्या जवळ (चंदगड बस स्टॉप) घडली.
महेंद्र देशपांडे यांच्या बंगल्या समोरील उंच नारळाचे झाड हाय टेन्शन तारेवर कोसळले त्यानंतर विजेचा खांब कोसळून शॉर्ट सर्किट झालं मोठा आवाज आला यामुळे भयभीत झालेले लोक सैरावैरा पळू लागले त्यामुळं इथे बराच काळ गोंधळ उडाला होता. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी या घटनेत झाली नाही यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
सदर घटनेमुळे बस मधले प्रवाशी देखील गाडीतून बाहेर पडले होते यामुळे दोन्ही कडून येणाऱ्या बस गाड्या एकाच ठिकाणी थांबल्याने या रोड वर दोन्ही कडून ट्रॅफिक जाम झाला होता.घटनास्थळी हेस्कॉमचे कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी विद्युत वाहिन्या झाड बाजूला केलं.कॅटोंमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष साजिद शेख यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.सोमवार सकाळ पासून पावसाचे संततधार वाढली आहेत त्यामुळे जुनाट वृक्ष कोसळत आहेत रस्त्यावर यावर्षी बरीच झाडं कोसळली आहेत.