बेळगाव महा पालिका अखत्यारीत आणि वनविभागाच्या हातात असणाऱ्या भूतरामहट्टी येथील उद्यान व प्राणी संग्रहालयात लवकरच टायगर सफारीची सोय मिळणार आहे. नुकतीच बेळगाव पालिका आयुक्त, काही अधिकारी आणि वनविभागाने संयुक्त पाहणी केली आहे.
तिसऱ्या टप्प्यात बेळगाव महानगरपालिका साठी मिळणाऱ्या १०० कोटी अनुदान पैकी २ कोटी रुपये खर्चून ही टायगर सफारी आणि सुसज्ज रिसॉर्ट उभारण्यात येणार आहे. अशी माहिती बेळगाव live ला मिळाली आहे.
एकूण ५००० चौ फूट जागेत हे अभयारण्य आहे. येथे नागरिकांना आपला वेळ घालवून करमणुकीसाठी तसेच ज्ञानात भर घालण्यासाठी विविध पक्षी आणि प्राणी सोडण्यात आले आहेत. आता १.८ किमी जागेत ८ फूट उंचीची भिंत बांधून त्यामध्ये वाघ सोडले जातील आणि पर्यटकांसाठी एक चांगली संधी दिली जाणार आहे. पालिका अधिकाऱ्यांनी या अभयारण्याच्या आतील भागात एक सुसज्ज रिसॉर्ट बांधून पर्यटकांना आकर्षित करत येईल असा विचार पुढे आला आहे. या पार्क मधील तळ्यात वाघ राहायला टायगर सफारीला अनुकूल सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
अभियंते आर एस नायक, पालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी ही पाहणी केली असून लवकरात लवकर हा प्रकल्प पुढे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 8 रिसॉर्ट तयार केले जाणार आहेत त्याचा फायदा पर्यटनाला होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली