राज्यातील वाल्मिकी समाजासाठी दोन मंत्री पदे मागितली आहेत हे खरं असलं तरी भाऊ सतीश जारकीहोळी यांनाच द्या अशी मागणी केली नाही असं मत पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांनी व्यक्त केलंय. हुक्केरी तालुक्यातील हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयाची गंगापूजा केल्यावर पत्रकारांशी बोलत होते.
एकाच समाजातील दोन्ही भावांना मंत्री मिळेल असा मोह आम्हाला नाही जारकिहोळी बंधू हे बळळारीचे रेड्डी बंधु नव्हे मंत्री पद मला मिळालं काय आणि सतीश ना मिळालं काय दोन्ही एकच असे म्हणत त्यांनी सतीश जारकिहोळीना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला. जेंव्हा चालत होत तेंव्हा अति केल्यास देव काय ते दाखवून देतो म्हणून सत्ता असते तेंव्हा सामान्य माणूस आणि समाजासाठी राबायला हवं असे देखील ते म्हणाले.यावेळी आमदार रमेश कत्ती,दुर्योधन ऐहोळे, महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.
कित्येक वर्षा नंतर लवकरच हिडकल जलाशय भरला असून नगर प्रशासन मंत्री रमेश जारकिहोळी यांनी विधिवत पूजा करून जलाशयाचे गंगापूजन केलं. या जलाशयाची क्षमता 51 टी एम सी असून पूर्ण भरल्याने सर्व दरवाजे खोलण्यात आले आहेत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.