के एल एस शाळेमधे प्रतिभा कारंजी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत जाणूनबुजून मराठी विद्यार्थ्यांना डावलण्यात आल्याचे दिसून आले. यात स्पर्धेत काही शिक्षकांनी हा खेळ खेळला आहे त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी मुलांना वगळल्याने पुन्हा एकदा कानडी प्रेम दाखवून दुजाभाव करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. काही निकालामध्ये बराच गोंधळ उडाला असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
जाणीव पुर्वक मराठी शाळेच्या विद्यार्थी, विद्यार्थीनीं च्या वर अन्याय झाल्याचे बोलले जात आहेे. त्यामुळे मराठीवर वारंवार अन्याय केल्याचेच दिसून येत आहे. मराठी कमी दाखवण्यासाठी हे प्रयत्न सुरू असून शिक्षकांनीही दुजाभाव दाखविल्याने संताप व्यक्त केला जात आहे.स्पर्धेच्या परीक्षकांना नियम माहीत नसल्याने व आपल्या स्वकीयाना नंबर मिळवून देण्यासाठी काही शिक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र ते जिंकले व लहान विद्यार्थी हरले असे दिसून येत आहे.
सरकार च्या नियम बाजुला सारून परीक्षकानी आपल्याच नियमा प्रमाणे स्पर्धा संपन्न केल्या. मराठीं माध्यमाच्या विद्यार्थीनीने कन्नड मधून भगत सिंह पात्र साकारला त्यापेक्षा भाजीवालीचे पात्र सक्षम ठरले आहे.क्लस्टरच्या प्रमुख या शिक्षकांची बाजु घेतल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.