Friday, May 3, 2024

/

‘कालिकादेवी सोसायटीच्या अध्यक्षांचे निधन’

 belgaum

बापट गल्ली येथील कालिकादेवी सोसायटीचे अध्यक्ष शशिकांत दीनानाथ  कारेकर वय 53 वर्षे रा.मराठा कॉलनी टिळकवाडी यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

Shashikant pawar

टिळकवाडी पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे मराठा कॉलनी येथील राहत्या घरातून उठून ते घरातील गॅरेज मध्ये गाडी काढण्यासाठी गेले असता त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला लागलीच त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र त्यांचं निधन झालं होतं.

 belgaum

गेले महिनाभर अगोदर त्यांना हृदय विकाराचा सौम्य झटका आला होता त्यावर उपचारही सुरू होते शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा झटका आल्याने त्यात ते दगावले असल्याचा प्राथमिक अहवाल देखील डॉक्टरांनी दिल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

बापट गल्ली येथील कालिकादेवी सोसायटीतील गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी प्रकरणा नंतर ते अस्वस्थ होते त्यातच काल केदनूर मध्ये झालेल्या प्राप्ती कर धाडीतील ठेव देखील कालिकादेवी संस्थेत होती त्याची चौकशी देखील प्राप्ती कर अधिकाऱ्यांनी कालच  संस्थेत येऊन केली होती या सर्व घटनेनंतर देखील अत्यवस्थ होते त्यातच हा झटका आल्याची माहिती मिळाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.