बापट गल्ली येथील कालिकादेवी सोसायटीचे अध्यक्ष शशिकांत दीनानाथ कारेकर वय 53 वर्षे रा.मराठा कॉलनी टिळकवाडी यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
टिळकवाडी पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे मराठा कॉलनी येथील राहत्या घरातून उठून ते घरातील गॅरेज मध्ये गाडी काढण्यासाठी गेले असता त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला लागलीच त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले मात्र त्यांचं निधन झालं होतं.
गेले महिनाभर अगोदर त्यांना हृदय विकाराचा सौम्य झटका आला होता त्यावर उपचारही सुरू होते शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा झटका आल्याने त्यात ते दगावले असल्याचा प्राथमिक अहवाल देखील डॉक्टरांनी दिल्याचं पोलिसांनी म्हटलंय.
बापट गल्ली येथील कालिकादेवी सोसायटीतील गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी प्रकरणा नंतर ते अस्वस्थ होते त्यातच काल केदनूर मध्ये झालेल्या प्राप्ती कर धाडीतील ठेव देखील कालिकादेवी संस्थेत होती त्याची चौकशी देखील प्राप्ती कर अधिकाऱ्यांनी कालच संस्थेत येऊन केली होती या सर्व घटनेनंतर देखील अत्यवस्थ होते त्यातच हा झटका आल्याची माहिती मिळाली आहे.