Wednesday, January 15, 2025

/

‘उद्याने सातच्या आत बंद’

 belgaum

अंमली पदार्थावर आळा घालण्यासाठी आता उद्यानावर नजर ठेवण्यात आली आहे. अल्पवयीन मुले ही उद्यानात अंमली पदार्थ सेवन करीत आहेत. त्यामुळे यापुढे सर्व उद्याने सायंकाळी ७ च्या आत बंद करण्याचा आदेश पोलीस आयुक्त डॉ. डी सी राजप्पा यांनी दिला आहे. त्यामुळे यापुढे आला सर्व उद्याने ७ च्या आत बंद करण्यात येणार आहेत.

गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. बेळगावात अंमली पदार्थ विक्री आणि सेवनाचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी उपाय योजना म्हणून आयुक्तांनी ही पावले उचलली आहेत.

Gardens in bgm

 

विशेषतः इंजिनियरिंग आणि मेडिकल कॉलेज मधून विशेष लक्ष ठेवा अश्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत या शिवाय शहत परिसरातील अज्ञात अशी वर्दळ नसणारी बांधकामे शोधा अश्या सूचना देखील शहरातील पोलीस स्थानकाना दिल्या आहेत संशयित पान शॉप आणि मेडिकल दुकानांच्या तपासणीचे काम सूरु असल्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.बेळगावात मुंबई सह इतर ठिकाणाहून अंमली पदार्थ तस्करी करण्यात येते. ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावतील अनेक उद्यानात अल्पवयीन मुले नशेच्या आहारी जात आहेत. ही मुले अधिकतर शहरातील विविध उद्यानात अंमली पदार्थ सेवन करत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी सर्व मुले विशेषकरून उद्यानात नशा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उद्याने ७ च्या आत बंद करण्याचा आदेश देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त यांनी दिला आहे.

rajappa-cop-324x160

तसे पाहता अंमली पदार्थ विक्री व नशा करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणे गरजेचे आहे. मात्र उद्याने बंद करून पोलीस प्रशासन काय साध्य करणार आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पोलीस आयुक्त डॉ डी सी राजप्पा यांनी पत्रकार परिषदेत उद्यानामध्येच मुले नशा करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे जर उद्यानात ही विक्री अथवा नशा करत असतील तर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र उद्यानात असे प्रकार घडत आहेत म्हणून उद्द्याने ७ च्या आत बंद करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.