सर्वाधिक उत्पन्न देणारी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एपीएमसी मध्ये आता अवैद्य धंद्यांना उत आला आहे, मद्य, हिडीस प्रकार यासह आणि बऱ्याच प्रकारांची चर्चा सुरू आहे. हे सर्व प्रकार होत असतानाही याकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे प्रकार थांबवावेत, अशी मागणी केली जात आहे.
रात्रीच्या वेळी काही मद्यपी येथे येऊन दारू ढोसत आहेत. दारू ढोसन्याबरोबरच नाचणे, दंगा घालणे यासह अनेक गैरप्रकार करत आहेत. दरम्यान काही महिलाही रात्रीच्यावेळेस येथे येऊन दंगा घालत असल्याचे प्रकार घडत असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तेव्हा असे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनीही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकीकडे भाजी मार्केट उभे करून अनेक व्यापाऱ्यांना सहाय्य ठरणारे ते भाजी मार्केट आता अवैद्य धंद्याचे केंद्रबिंदू ठरत आहे. महिलांना छेडछाड करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी येथून जाण्यासाठी ही महिला घाबरत असल्याचे दिसून येत आहे.
रात्री १० नंतर येथे असे गैरप्रकार घडत आहेत. एपीएमसी मध्ये वारंवार वर्दळ असते. व्यापारी व शेतकरी मालाची ने आण करत असतात. मात्र रात्रीच्यावेळी ही वर्दळ कमी असल्याने अनेकांचे फावते आहे. तेंव्हा याबाबत गांभीर्याने दखल घेऊन येथील मद्यपी व गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार की
प्रशासन दुर्लक्ष करून नागरिकांची हेळसांड करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनीही याबाबत लक्ष देऊन गैर प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.