तुड़िये, हाजगोळी, मुख्य धरण धामणे परिसरातील तिलारी जलविद्युत प्रकल्पासाठी असणाऱ्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बारमाही मासेमारी होते. खासकरून पावसाळ्यात मासेमारी अधिक करण्यात येते व मासे खरेदीसाठी खवय्ये ही जास्त प्रमाणात येत असतात कारण यावेळी सापडणाऱ्या माशांच्या पोटात सर्रासपणे अंडी असतात म्हणुन पावसाळ्यातील मासे अधिक रुचकर लागतात त्यामुळेच तुड़िये, हाजगोळीसह चंदगड़, बेळगाव परिसरातील सरासरी पाहता चाळीस लोक दरदिवशी तिलारी जल विद्युत प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील परिसरात मासेमाऱ्यांकडुन मासे विकत घेण्यासाठी येत असतात.
या ठिकाणी प्रामुख्याने *नवरंग* , कटला, वाडीस, रावस, गोधळसह अनेक प्रकारचे मासे सापडतात. यामधील **नवरंग**मास्याला विशेष रुची असल्याने खासकरून हा मासा खरेदी करण्यासाठी खुप लांबवरून लोक येथे येत असतात तुड़िये, हाजगोळी परिसराची ओळख ही **नवरंग**मास्याच्यां मासेमारीमुळे सर्वदूर आहे. येथे अर्धा किलोपासुन तीस पस्तीस किलोपर्यंत वजनाचे मासे सापडतात. साधारणपणे 120 ते 150 रुपये प्रति किलो दराने हे मासे मासेमाऱ्यांकडुन गिर्हाईकानां विक्री केले जात आहेत. मासेमारीचे प्रमाण वाढले आहे पण मासे कमी प्रमाणात सापडत आहेत, येथिल मास्याच्यां विशेष चवीमुळे मासे कमी प्रमाणात सापडत असले तरीही..
मासे खवय्यांची गर्दी मात्र पाणलोट क्षेत्रातील तुड़िये, हाजगोळी परिसरात गटार अमावस्येच्या पाश्वभूमीवर दिवसेंदिवस वाढतच आहे.
न्यूज अपडेट : उत्तम भरमू पाटील.