एक एजंटाने फसवल्यामुळे बेळगावचे दोन तरुण मलेशियात अडकले आहेत. त्यांची सुटका करून त्यांना परत आणा आणि त्या एजंट वर कारवाई करा अशी मागणी होत आहे.
शहानवाज बोजगार (रा. आझादनगर) आणि सुरेश परीट( रा. मोदगा) अशी मलेशिया देशात अडकून पडलेल्या त्या युवकांची नावे आहेत. महंमद यासीन या एजंट ला प्रत्येकी १ लाख रुपये देऊन ते नोकरीसाठी मलेशियाला गेले होते. मागील पाच महिन्यापासून ते काम करत असून त्यांना पगार दिला जात नाही.
ते भारतात परतण्याच्या प्रयत्नात असून त्यांना परत आणा अशी मागणी त्यांच्या पालकांनी भारत सरकारकडे केली आहे.
पाच महिने उलटले तरी त्यांना पगार देत नाहीत. जेवण नाही उलट कंपनी त्रास देत आहे असे त्यांनी फोनवर सांगत आहेत.
त्या एजंट ला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही म्हणून पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन तक्रार देण्यात आली आहे.
या पालकांना जय कर्नाटक संघटनेच्या माध्यमातून मदत केली जात आहे. बेळगाव आणि भागातून परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक होत असून या घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे.