बाळेकुंद्री के एच ग्राम पंचायतीचे अध्यक्ष आणि पी डी ओ यांनी चालवलेल्या गैर व्यवहार आणि भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी मागणी तालुका पंचायत सदस्य निलेश चंदगडकर यांनी केली आहे.
शुक्रवारी जिल्हा पंचायत सी इ ओ रामचंद्र राव आणि तालुका पंचायत सी इ ओ कडे निवेदन देऊन केली आहे.
बाळेकुंद्री के एच ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात राबवलेल्या प्रत्येक योजनेत गैर व्यवहार आणि भ्रष्टाचार करण्यात आला आहे.स्वच्छता,रस्ते,सी सी टी व्ही बसवणे आदी योजनेत भ्रष्टाचार झाला असून तो जाहीर झाला आहे अध्यक्ष आणि पी डी ओ दोघांवर देखील कायदेशीर कारवाई केली जावी या अस देखील जिल्हा पंचायत सी इ ओ ना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
बाळेकुंद्री के एच येथील भ्रष्टाचारात ग्राम पंचायत अध्यक्ष आणि पी डी ओ सहभाग आहे असा गंभीर आरोप देखील चंदगडकर यांनी निवेदनात केला आहे.
बेळगाव live ने देखील बाळेकुंद्री के एच येथील रस्ता तसाच ६२ लाख खिशात! या मथळ्याखाली बातमी कालच प्रसिद्ध केली होती त्यानंतर एकाच दिवसात तालुका पंचायत सदस्य निलेश चंदगडकर यांनी चौकशीची मागणी केली आहे.
पेठ गल्ली ते थोरला तलावापर्यंतच्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून बंद करून याला मंजूर झालेले अनुदान लाटण्यात आले आहे. ६२ लाख रुपये मंजूर झालेला रस्ता कोठे आहे? असा प्रश्न विचारला जात असून भ्रष्ट पी डी ओ वर त्वरित कारवाई झाली पाहिजे अश्या संतप्त प्रतिक्रिया मिळत आहेत.