स्मार्ट सिटी योजनेतून बेळगाव स्मार्ट करण्याचे जोरात प्रयत्न सुरू आहेत. आत्ता पाणी पिण्याची सुद्धा स्मार्ट पद्धत उपलब्ध होणार असून शहरात ५० ठिकाणी पाणी स्वच्छ मिळेल.
स्मार्ट सिटी लिमिटेड च्या वतीने बेळगाव शहराच्या विविध ५० भागांमध्ये स्मार्ट पाणी मिळणार आहे. यासाठी ठिकठिकाणी कॉइन टाकून पाणी घेण्याची मशीन बसवली जाणार आहे. अशा एक मशीनचा खर्च ८ लाख रुपये राहणार असून एकूण खर्च ४ ते ५ कोटीच्या घरात जाईल.
कॉइन टाकून शुद्ध पाणी मिळाल्यास अस्वच्छ पाणी पोटात जाण्याचा धोका निवारला जाणार आहे तर बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी बाटलीतील पाणी खरेदी करावी लागणार नाही.
पाणी ही सर्वात मोठी गरज आहे, यासाठी शहर स्मार्ट करताना सर्वात पहिल्यांदा शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी झाली होती ही मागणी गंभीरपणे घेऊन अधिकारी वर्ग कामाला लागला आहे.