बेळगाव पालिकेच्या वतीनं राकसकोप जलाशयाचे गंगा पूजन सोमवारी करण्यात आले.महापौर बसप्पा चिखलदिनी आणि उपमहापौर मधूश्री पुजारी यांनी विधिवत पूजा करून जलाशयाचे पूजन केले.
गेल्या महिनाभर होत असलेल्या संततधार पावसामुळे 16 जुलै रोजीचं शहराला पाणी पुरवठा करणार राकसकोप जलाशय तुडुंब भरलं होत त्याच्या पंधरा दिवसा नंतर आज गंगा पूजन झाले.यावेळी पालिका आयुक्त एम शशिधर कुरेर,नगरसेवक किरण सायनाक, सरिता पाटील,संज्योत बांदेकर, गट नेते संजय शिंदे,सुधा भातकांडे,रेणू मुतगेकर,वैशाली हुलजी यांच्या सह अन्य नगरसेवक पाणी पुरवठा विभाग आणि पालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रत्येक वर्षी राकसकोप जलाशय भरल्यावर शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर या जलाशयाचे गंगा पूजन करत असतात मात्र यावेळी नुतन आमदारांनी जुन्या परंपरेला छेद देत याच जलाशयाचे गंगा पूजन केले होते आज पुन्हा एकदा महापौर उपमहापौरानी गंगा पूजन केले.आजच्या शासकीय रीतसर झालेल्या गंगा पूजनास मात्र पहिल्यांदा गंगा पूजन करणाऱ्या आमदाराने हजेरी लावली नाही हा यावेळी चर्चेचा विषय होता.