नगरसेवक म्हटला की पालिका कर्मचाऱ्यांना आदेश देऊन कामे करवून घेणार,ठेकेदाराला काम कसं झालं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करणार आणि शेवटी काम पूर्ण झाल्यावर टक्केवारी घेणार अशी सर्व साधारण इमेज तयारी झाली आहे मात्र या सगळ्यांला फाटा देत प्रभागातील जनतेचं पालकत्व स्वीकारणारा अवलिया नगरसेवक बेळगाव पालिकेत आहे. तो पेशाने स्वतः डॉक्टर आहे म्हणून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा आहे.
शहरात एकीकडे डेंग्यू मलेरियाच्या साथीमुळे विविध सामाजिक संघटना कडून प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहीमा चालल्या आहेत. स्वता पेशाने डॉक्टर असलेले प्रभाग क्रमांक ५२ चे नगरसेवक डॉ दिनेश नाशिपुडी यांनी आपल्या प्रभागात स्वच्छता रोग नियंत्रणाचा भार स्वतःच्या खांद्यांवर घेतलाय. डेंग्यू मलेरिया सारख्या रोगांवर नियंत्रणासाठी उपाय म्हणून ते स्वताच्या खांद्यावर मशीन घेऊन वार्डात औषधांची फवारणी करत आहेत दर वर्षी मान्सून मध्ये ते फवारणीचे कार्य करतच असतात.
डॉ दिनेश नाशिपुडी गेल्या चार दिवसापासून पालिकेची फवारणी मशीन घेऊन वार्डात औषध मारायचे दिसत आहेत ते दवाखाना सुरु व्हायच्या अगोदर आणि दवाखाना बंद झाल्यावर त्यांनी हे फवारणीचे काम त्यानी फावल्या वेळेत हाती घेतले आहे. आपल्या वार्डात ९० टक्क्के फवारणी त्यांनी पूर्ण केली असून उर्वरित दहा टक्के ते पाऊस कमी झाल्यावर करणार आहेत.एरव्ही खिशात हात घालून शासकीय अधिकारी आणि ठेकेदारांना आदेश देणारा आपल्या प्रभागाचा नगरसेवक गटारी खुल्या जागेत पाठीवर मशीन घेऊन स्वता फवारणी करत असल्याचे दृश्य या भागातील जनतेला लोक प्रतिनिधीने पालकत्व जपवणारे आहे.
आज कोणतेही काम केलं तर सोशल मीडियावर लगेचच फोटो अपलोड केले जातात मात्र गेले चार एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचं ओझे उचलण्याचे काम करताहेत त्यांनी स्वतःला पब्लिसिटी पासून दूरच ठेवलं आहे त्यामुळं स्वच्छता मोहिमा हाती घेऊन सोशल मिडियावर झळकणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यांच्या कडून नक्कीच शिकायला हवं.
“हे काम करण्यासाठी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्या कडून त्यांना नेहमी आश्वासनेच मिळाली असल्याने त्यांचा पालिकेवरचा विश्वासच उडाला आहे अधिकारी नेहमी कर्मचाऱ्यांची कमतरता सांगत असतात तर कधी काम करण्यासाठी निधीची कमतरता सांगतात त्यामुळे पालिकेत जाऊन मीच फवारणी यंत्र आणि केमिकल आणले मात्र पालिकेने मशीन साठी लागणारे पेट्रोल डीजेल मात्र दिले नाही माझ्या खिश्यातून पेट्रोल डीजेल साठी खर्च करून मी फवारणी करत आहे” अशी माहिती त्यांनी बेळगाव live शी बोलताना दिली. अर्धा तास फवारणी करण्यासाठी चार लिटर डीजेल आणि दोन लिटर पेट्रोल लागतो फवारणी यंत्रास दोन टाक्या असून पेट्रोल आणि डीजेल घातल्या शिवाय सुरूच होत नाही असा देखील दावा त्यांनी केलाय.
ते पुढे म्हणाले की “माझ्या प्रभागात खुली जागा जास्त असल्याने डासांचा प्रादुर्भाव भरपूर आहे त्यातच पालिके कडून कचऱ्याची उचल योग्य होत नसल्याने आम्हाला पालिकेवर निर्भर न राहता स्वत फवारणी करण्याची वेळ आली आहे गटार बंद झाली असल्याची समस्या भरपूर आहे .मी ३६ हजार रुपये खर्चून गवत कापायची मशीन खरेदी केली असून औषध फवारणी होऊन पाऊस कमी झाल्यावर पालिकेच्या खुल्या जागेतील गवत कापणार आहेत. फवारणी आणि खुल्या जागेतील गवत कापल्यावर आपल्या वार्डात जवळपास ७० टक्के रोगमुक्त होईल” असा दावा त्यांनी केलाय.
प्रभागातील जनतेचं ओझं उचलून पालिकेच्या 58 नगरसेवका पेक्षा आपण वेगळे आहोत हेच त्यांनी दाखवून दिलंय त्यांच्या कार्यास बेळगाव live चा सलाम…उर्वरित नगरसेवकांनी यांच्याकडून शिकावं हीच सदिच्छा