बेळगाव भागात विमान प्रवाश्यांची क्षमता चांगली आहे या साठी सर्व्हे केला असून आगष्ट महिन्यापासून एअर इंडियाच्या विमान सेवा विमानसेवा सुरु करण्याचा विचार आहे असे आश्वासन एअर इंडिया चेन्नई विभागाचे मुख्य विभागीय संचालक एम व्ही जोशी यांनी दिले आहे.
अलायन्स एअरवेज ही एअर इंडियाचीच उपकंपनी आहे कालपासून एअर इंडिया वरिष्ठ अधिकारी बेळगावात होते त्यांची भेट सिटीजन कौन्सिलने घेऊन बेळगावातून एअर बस ३१९- आणि एअर कारगो आणि अग्री कारगो सेवा सुरु करण्याचे निवेदन देऊन मागणी केली असता एम व्ही जोशी यांनी वरील आश्वासन दिले आहे.
बेळगाव विमान तळ नवीन केल्या पासून स्पाईस जेटला चांगला प्रतिसाद होता ज्यावेळी एकच विमान होते त्यावेळी एका वर्षात ९ हजार प्रवाशी प्रवास करत होते त्या नंतर मुंबई हैद्रबाद चेन्नई सुरु केल्यावर केवळ नऊ महिन्यातच ही संख्या १८ हजारांनी वाढली होती या विभागाला विमान सेवा सुरु करण्यास चांगला पोटेंशीयल आहे त्यामुळे हुबळी प्रमाणे(५०७ -५०८) बेळगावातूनही बेळगाव बंगळूरू मुंबई अशी सेवा सुरु करावी अशी मागणी केली. एअर बस उतरवण्याची क्षमता बेळगाव विमान तळाची आहे असेही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.
इंडस्ट्री अग्री कारगो सुरु करा-
या भागातील शेती माल खूप प्रसिद्ध आहे वेगवेगळी फुलं हिरव्या भाजी एअर कार्गो द्वारे जगभरात जाऊन योग्य सोय होऊ शकते त्यामुळे बेळगाव परिसरातील शेती माल फुल आणि हिरव्या भाजीपाल्याला जगप्रसिद्ध बनवून योग्य भाव मिळवून देण्यासाठी एअर कार्गो ,अग्री कारगो इंडस्ट्री कारगो सुरू करण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी करण्यात आली.निवेदनाची प्रत नागरी विमान उड्डाण मंत्र्यांना देखील पाठवण्यात आली आहे.
यावेळी एअर इंडियाचे दक्षिण विभागीय कमर्शियल महा प्रबंधक राजा बाबू,मुख्य कार्यालयाच्या अधिकारी शैला जैन,बेळगाव विमान प्रमुख अधिकारी राजेश कुमार मौर्य,एअर पोर्ट संचालक पी एस देसाई, सिटीजन कौन्सिल चे सतीश तेंडूलकर, सेवांतीलाल शाह, आदी उपस्थित होते.