स्मार्ट सिटी योजनेत राज्य सरकारचा वेळकाढू पणा मुळे कामे सुरुवात होण्यास विलंब होत आहे यासाठी त्वरित कामे सुरू करण्याचे आदेश देऊन बेळगावात येऊन स्मार्ट सिटी कामांची आढावा बैठक घेऊ असे आश्वासन केंद्रीय नगरविकास मंत्री हर्दीप सिंह यांनी दिले आहे.
मंगळवारी दिल्ली मुक्कामी खासदार सुरेश अंगडी यांनी सिंह यांची भेट घेतली असता त्यांनी वरील आश्वासन दिले आहे.केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बेळगावला कोट्यावधी रुपयांचं अनुदान दिलंय निधी बॅंकेत पडून आहे मात्र अद्याप कामांना गती आलेली नाही अधिकारी कोणतेच काम जबाबदारीने करायला तयार नाहीत.स्मार्ट सिटी कार्यालयात मॅनेजिंग डायरेक्टर आणि संचालक व्यतिरिक्त सगळी पदे रिक्त आहेत असे असताना काम कोण करणार असा प्रश्न उपस्थित करत अंगडी यांनी मंत्र्यांना बेळगावातील स्मार्ट योजनेची माहिती करून दिली वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत बैठक घ्या अशी विनंती केली आहे.
बेळगावच्या स्मार्ट सिटी प्रोजेक्ट मध्ये कर्नाटक सरकारची निराशा असून यात मंत्र्यांनी हस्तक्षेप करून अधिकाऱ्याना कामे सुरू करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती देखील अंगडी यांनी केली आहे.यावेळी भाजप नेते मुतालिक देसाई उपस्थित होते.
पुढील वर्षी निवडणूक असल्याने खासदार अंगडी यांना बेळगाव साठी काही तरी ठोस करून दाखवायचे आहे त्यामुळेच अंगडी यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन स्मार्ट सिटी प्रोजेकट मधली रखडलेली कामे सुरू करण्याचा प्रयत्न करत असतील असे सध्या तरी दिसत आहे.