उत्तर कर्नाटकच्या विकासाकडे लक्ष न दिल्यास वेगळ्या राज्याची मागणी करू असा इशारा उत्तर कर्नाटकातील विविध मठांच्या मठाधिशानी दिलाय. मंगळवारी सुवर्ण विधान सौध समोर राज्य सरकार उत्तर कर्नाटकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत धरणे आंदोलन केले. उत्तर कर्नाटकातील विविध मठांचे ५० हून अधिक स्वामीजींनी यात सहभाग दर्शवला होता.
वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी उत्तर कर्नाटक राज्याचा वेगळा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता.वेगळे राज्य हवे या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या संघटनेचे सचिव नागेश गोळशेट्टी यांनी हा वेगळा ध्वज स्वामीजींना दाखवून फडकवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलयावेळी बराच काल गोंधळ निर्माण झाला होता. बाळशेट्टी यांनी दक्षिण कर्नाटकातील राजकारण्यांचे आश्वासन ऐकून कंटाळा आला असल्याचा आरोप केला.
रुद्राक्षी मठाचे डॉ सिद्धराम स्वामीजी यांनी उत्तर कर्नाटकावर विकासाच्या दृष्टीने अन्याय झाला असून अखंड कर्नाटक निर्माण झाल्यावर लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
आंदोलनात येडियुराप्पा सहभागी
सुवर्ण सौध ला उत्तर कर्नाटकाचे प्रशाकीय शक्ती केंद्र करू असे आश्वासन देत आलमट्टी जलाशयाच्या उंची वाढवण्याची योजना अपूर्ण झाली असल्याचा आरोप केला. २ आगष्ट रोजी उत्तर कर्नाटक बंद आंदोलन मागे घ्या अशी विनंती करत स्वत १३ जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान वडील मुलगा यांनी उत्तर कर्नाटकासाठी योगदान काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. सुवर्ण सौध समोर चाललेल्या मठाधीशांच्या धरणे आंदोलनात माजी मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा यांनी सहभाग दर्शवला होता