ज्या मनपात नगरसेविकांना स्थान आहे, जेथे महिलांनी महापौरपद अनेकदा भूषवले आहे, जेथे अधिकारी पदावर महिला येऊन गेल्या त्याच मनपामध्ये महिला कर्मचारीवर हात उगारण्यात आल्याची समस्त स्त्री जातीचा अपमान करणारी घटना घडली आहे. सोमवारी झालेली ही घटना अतिशय गंभीर असून मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
जन्म आणि मृत्यू दाखला विभागात काम करणाऱ्या संगीता गुडीमनी यांच्यावर त्या काम करत असताना ही मारहाण झाली आहे. प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे पण कायम कामात राहणाऱ्या आणि कधीच कर्तव्यात कमी न पडणाऱ्या या महिलेवर हात उचलण्यात आल्याने खळबळ माजली आहे.संगीता या सेकंड डिव्हिजन क्लार्क म्हणून काम करतात. एक महिलेवर हल्ला करण्याची हिझडेगीरी करण्याची घटना निंदेची धनी ठरली आहे.
*मद्यधुंद एफडीसी ची मारहाण*
ही मारहाण करण्यात महानगरपालिकेत काम करणारा मद्यधुंद एफडीसी विजय कोटूर याचा हात आहे. तुम्ही मला त्रास देऊ नका बाहेर जा असे सांगितले म्हणून दारूच्या नशेत असलेल्या त्या कोटूर ने संगीता बसलेल्या खुर्चीवर लाथ मारली व संगीता यांनाही लाथ मारली.
या घटनेत खुर्ची कलांडून पडली तर संगीता या समोर असलेल्या संगणकावर जाऊन आपटल्या.
*कारण काय*
या मारहणीची बाजू कुणीच घेऊ शकत नाही एक महिलेवर हात किंव्हा पाय उचलणे आणि मनपात मद्यधुंद अवस्थेत येणे हे कुणालाही शोभणारे नाही.
कोटूर याच्या एका मित्राने मागितलेल्या दाखल्यात चूक झाल्याने कोटूर भडकला होता, त्यातच संगीता हिच्या खुर्चीमागे बसून त्याने आरोग्यअधिकारी शशीधर नाडगौडा यांना शिवीगाळ सुरू केली होती, तेंव्हा संगीता यांनी सर तुम्ही असले काहीतरी बडबडत बसू नका, मला काम करू द्या आणि बाहेर जावा असे म्हटले म्हणून कोटूरने एवढा धिंगाणा घातला आहे.
आता प्रकरण मिटवून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. ज्या मनपात महिला कर्मचारीचा अपमान होतो ती मनपा शहर काय सांभाळणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार करण्यात आली नसून पालिकेचे वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण पालिकेतच संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.